डी.जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअर साठी उपयुक्त असा फाऊंडेशन कोर्स सावंतवाडी


सावंतवाडी प्रतिनिधि
डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअर साठी उपयुक्त असा फाऊंडेशन कोर्स सावंतवाडीतच असताना आता शहराबाहेर जाण्याची गरज नाही
सिंधुदुर्गातील कलाकाराना यामुळे भरपूर फायदा होणार आहे. आज कलेची पदवी घेऊन मोठ्या शहरात तसेच विदेशात आपले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव मानाने मिरवताना अनेक कलाकार आपल्याला दिसतात. याचं कारण म्हणजे कलेला दिशा देणारी माणसं, शिक्षक, कला जोपासणाऱ्या संस्था आणि कलेला प्रोत्साहन देणारा पालकवर्ग.

या क्षेत्राकडे वळताना सीईटी परीक्षेविषयी पूर्व कल्पना व तयारी होण्याच्या दृष्टीने हा एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स खूप उपयुक्त ठरत आहे. बदलत्या शिक्षण प्रकाराबरोबर नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना या गोष्टींकडे पाहता UI UX, सॉफ्टवेअर, आर्ट, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टाइपोग्राफी, डूडलिंग, क्ले मॉडेलिंग, ॲनिमेशन अशा गोष्टी या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना शिकता येतात. आणि मुख्य म्हणजे या कोर्स करिता कोणत्याही सीईटी परीक्षेची अट नसल्याने केवळ १० वी व १२ वीच नव्हे तर कलेचा छंद जोपासणाऱ्या सर्वच इच्छुकाना सहजपणे या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो.
येत्या जून महिन्यापासून या फाऊंडेशन कोर्स ची प्रवेश प्रक्रिया होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कला क्षेत्राकडे वळून आपले योग्य करिअर निवडावे असे आवाहन डी. जी. बांदेकर ट्रस्ट चे चेअरमन श्री. केदार बांदेकर आणि सचिव सौ. अनुराधा बांदेकर यांनी केले आहे.
कलेला पूरक असे वातावरण असणाऱ्या सावंतवाडीत बरेच मोठमोठे कलाकार होऊन गेले आणि आजही नवनवीन कलाकार घडत आहेत.
आपल्या पाल्याच्या १० वी नंतर किंवा १२ वी नंतर या कोर्स साठी आपण प्रवेश घेऊ शकता. अथवा ज्याना कलेची आवड आहे ते सुद्धा या प्रवेशासाठी पात्र आहेत.कोर्स फी मध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक आर्ट मटेरियल दिले जाईल.कोर्स ची वेळ 4 -7 असणार आहे.अधिक माहितीसाठी श्री. तुकाराम मोरजकर ९४०५८३०२८८ व श्री. सिद्धेश नेरुरकर ९४२०२६०९०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

