

एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
गौरांग गावकर २८ वा तर तेज मळगावकर ४८ वी
सावंतवाडी:
सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत तालुक्यातील शारदा विद्यालय मळगाव रस्ता प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. गौरांग पंढरीनाथ गावकर याने जिल्ह्यातून २८ वा तर तेज दत्ताराम मळगावकर हिने ४८ वा क्रमांक पटकविला. युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात या दोघांचा मेडल, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या परीक्षेसाठी त्यांना अस्मिता गोवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षक अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, वर्षा गवस या दोघांचे व या परीक्षेतील सर्व यशस्वी मुलांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





