वेंगुर्ला तालुक्यात रस्त्याची काम झाली त्यापैकी काहीं काम निकृष्ट दर्जाची झाली!सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर

सार्वजनिक बांधकामचे अभियंता महेंद्र किणी यांची घेतली भेट

वेंगुर्ला तालुक्यात रस्त्याची काम झाली त्या पैकी काही रस्त्यांची कामे पुर्ण निकृष्ट रस्त्याची झाली आहे. याकरता हि बाब निदर्शनास आणून देण्याकर्ता माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकामचे अभियंता महेंद्र किणी यांची भेट घेण्यात आली .यावेळी शिरोडा बायपास रस्ता व वेंगुर्ला आरवली शिरोडा रस्ता पावसाळ्या दरम्यान काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी रस्त्यांची काम झाली ते काम निकृष्ट दर्जाचे असून बऱ्याच ठिकाणी रस्त्या उकडला असून त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सदर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे. व ते पावसाळ्यानंतर योग्य पद्धतीने त्याचे काम व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर व राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी कार्यकारी अभियंता श्री. किणी यांच्याकडे केली.

तसेच पावसाळ्यात ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे सुरू आहेत. ती कामे तात्काळ थांबवून पावसाळ्यानंतर चांगल्या दर्जाने त्याची काम व्हावी व ती कामे योग्य पद्धतीने टिकावी असे. श्री. उपरकर यांनी कार्यकारी अभियंता यांना सांगितले. तर पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेली कामे तात्काळ थांबवून पावसाळ्यानंतर योग्य दर्जाची करणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता श्री. किणी यांनी माजी आमदार श्री उपरकर यांना दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, आबा चिपकर, संतोष सावंत, शुभम सावंत , नाना सावंत, बाळा बहिरे , आदेश सावंत आदि उपस्थित होते