

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर;
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर;
राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष!
सिंधुदूर्ग
भारतीय जनता पार्टीचे (भाजप) महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उद्या शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
ते सावंतवाडी येथे दाखल होणार असून, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांच्या शिरोडा नाका येथील कार्यालयात सकाळी ९.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या दौऱ्याची माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.
सावंतवाडी येथे नुकताच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या स्थानिक राजकीय वादानंतर प्रथमच हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा हा सावंतवाडी दौरा होत आहे.
त्यामुळे या पार्श्वभूमीवर, ते महायुतीमधील संबंध आणि स्थानिक वादावर काय भूमिका घेतात, याकडे केवळ सिंधुदुर्गचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेत ते पक्षाची पुढील रणनीती आणि स्थानिक वादावर तोडगा काढण्याबद्दल भाष्य करण्याची शक्यता आहे.





