भौगोलिक प्रतिकृतींच्या प्रदर्शनाने प्रशालेत भरला ‘संक्रांतीचा’ गोडवा!


14 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो याचे कारण म्हणजे
निरवडे प्रतिनिधि
भारतीय भूगोल शास्त्रज्ञ चंद्रशेखर धुंडीराज देशपांडे यांचा जन्मदिन. चंद्रशेखर देशपांडे यांनी भारतातील भूगोल क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतात भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो तसेच सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात संक्रांत म्हणतात. त्यामुळे हा दिवस मकर संक्रांति म्हणूनही साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या वेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा कालावधी सौर मास म्हणून ओळखला जातो. पौष महिन्यात उत्तरायण होऊन सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे आणि रात्री लहान होतात. याच दिनाचे औचित्य साधून संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेत भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भौगोलिक प्रतिकृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन निरवडे ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सौ. सुहानी गावडे मॅडम व उपसरपंच आदरणीय श्री. अर्जुन पेडणेकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर
करून हाताने बनवलेल्या प्रतिकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, भूगोलाविषयी व आपल्या पर्यावरणाविषयी जागृती व आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनासाठी विविध प्रतिकृती विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आल्या होत्या. उपस्थित प्रमुख पाहुण्यांद्वारे प्रदर्शनातील प्रतिकृतींचे परीक्षण करता विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण जाणून घेण्यासाठी व विद्यार्थ्यांमधील भूगोलाविषयीची आस्था जाणून घेण्यासाठी विविध प्रश्न विचारण्यात आले त्याची समर्पक उत्तरे विद्यार्थ्यांकडून मिळाल्यामुळे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची भावना व्यक्त होत होती. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता व कल्पकता वाढावी व भूगोल विषयाची आस्था व पर्यावरणाविषयीचे प्रेम, आपुलकी वाढावी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात असेच विविध उपक्रम करावेत व आपल्या गावचे नाव उज्वल करावे यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.सर्व विद्यार्थ्यांना प्रशालाचे भूगोल शिक्षक श्री. मनिष सावंत सर व सौ.प्रियांका शिरसाट मॅडम यांचे योगदान लाभले होते. दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय डॉ. शेखर जैन सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना भूगोल दिनानिमित्त व मकरसंक्रातीनिमित्त शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी असेच नवनवीन उपक्रम भविष्यात सुरू ठेवावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. हेमंत तानावडे सर यांनीही सर्व विद्यार्थ्यांना भूगोल दिनानिमित्त व मकर संक्रांतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती स्नेहल गवस मॅडम यांनीही सर्व विद्यार्थ्यांना भूगोल दिनाच्या व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सर्व विद्यार्थ्यांच्या या सुप्त गुणांचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
