‘चेटकी ‘या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी घेतली युवराज लखमराजे भोसले यांची भेट


सावंतवाडी
चेटकी या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी युवराज लखमराजे भोसले यांची सावंतवाडी राजवाड्यात सदिच्छा भेट घेतली.
या भेटी दरम्यान रात्रीस खेळ चाले तसेच श्री देव वेतोबा या मराठी मालीकांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरभरून यशा बद्दल चर्चा झाली. युवराज लखमराजे यांनी चित्रीकरण स्थळी येउन आपणास सुभेच्छा देउ असे मालीकेचे निर्माते सुनील भोसले यांना आश्वस्त केले व आपल्या स्तरावरून जे काही सहकार्य हवे असल्यास अवश्य केले जाईल असे सांगीतले.
.निर्माते भोसले यांच्या रात्रीस खेळ चाले या मराठी मालीकेला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दर्शवली होती..या मालीकांच्या चित्रीकरणामूळे जिल्ह्यातील अनेक कलाकारांना कॅमेरॅसमोर अभिनय करण्याची संधी उपलब्ध झाली असून अनेक रोजगाराच्या संधी या निमीत्ताने उपलब्ध होत आहेत सद्या चित्रीकरण सुरू असलेल्या चेटकी या मालीकेलाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रतीसाद मिळेल असा विश्वास निर्माते सुनिल भोसले यांनी व्यक्त केला.राजेसाहेब व राणी साहेब यांच्या भेटी घेउन निर्माते भोसले यांनी आशीर्वाद घेतले.
यावेळी स्थानिक व्यवस्थापक गजानन सातार्डेकर तसेच एल.एम.सावंत उपस्थित होते. चित्रीकरण सध्या मळगाव मध्ये सुरु आहे. यापूर्वी होडावडे, शिरोडा, रेडी, आडेली धरण,या ठिकाणीं, शुटींग करण्यात आले.
