ठळक घडामोडी

हिरकणी वस्तीस्तर संघ व फिटनेस योग अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

हिरकणी वस्तीस्तर संघ व फिटनेस योग अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात…

सावंतवाडी :

हिरकणी वस्तीस्तर संघ, काझी शहाबुद्दीन हॉल, सबनीसवाडा सावंतवाडी आणि फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उपक्रमाचा प्रथम वर्धापनदिन रविवारी (दि. ११ जानेवारी २०२६) उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास आदरणीय योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर व हिरकणी वस्ती संघाचे प्रमुख श्री. एकनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका मोहिनी मडगावकर, नगरसेविका सुनिता पेडणेकर, नगरसेविका शर्वणी धारगळकर, स्नेहा नाईक, सामाजिक कार्यकर्ता निशांत तोरस्कर, तसेच हिरकणी संघाच्या अध्यक्ष प्रगती बामणे, मनीषा बांदेकर, निलाबरी पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५, राष्ट्रीय शिक्षण रत्न सन्मान २०२५ तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा मानला जाणारा PRIDE OF NATION AWARD 2025 प्राप्त केला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला.
वर्धापनदिनानिमित्त योग, आरोग्य व समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडले.