

शिक्षण महर्षी विकासभाई सावंत यांना अखेरचा दंडवत !

विकास सावंत यांना अखेरचा दंडवत !
सावंतवाडी
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र, शि.प्र.मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी माजगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. शेकडोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी विकासभाई सावंत यांना अखेरचा निरोप दिला.







