संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची माध्यमिक शालांत परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम


सावंतवाडी प्रतिनिधि
माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 मध्ये दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक कु. मोरिश्का मनवेल डायस 91टक्के ,द्वितीय द्वितीय क्रमांक कुमारी कीर्ती काशीराम गावडे 86.20टक्के व तृतीय क्रमांक सोहम प्रसाद गुरव 79.20 टक्के मिळवत प्रशालेचे नाव उंचावले.
प्रशालेतून एकूण 14 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नरपत जैन सर संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉ.शेखर जैन सर प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय हेमंत तानावडे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.