

तळवडे येथे उद्या ‘श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
तळवडे येथे उद्या ‘श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
तळवडे:
श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्गच्या वतीने सन २०२६ च्या दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) भव्य प्रकाशन सोहळा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. तळवडे बाजारपेठ येथील ‘सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स’मध्ये सकाळी १० वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
या सोहळ्याचे अध्यक्षपद मंडळाचे जिल्हाध्यक्ष व उपप्राचार्य श्री. नारायण कृष्णा साळवी भूषवणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत गोरोबा काकांच्या प्रतिमेच्या पूजनाने होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री. संदीप गावडे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. यशवंत शेडुलकर, प्रदेश सचिव श्री. विलास गुडेकर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रुपरेषा
या सोहळ्यासाठी जिल्हयातील सर्व तालुका अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि बहुसंख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कार्यकारिणी आणि निमंत्रकांनी केले आहे. तळवडे आणि परिसरातील समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे





