तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन आज मंगळवार ६ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन संपन्न झाला.

यावेळी सकाळी ७ ते १२.३० वाजता धार्मिक विधी सोहळा,दुपारी १२.३० वाजता आरती,गाऱ्हाणे,दुपारी १ वाजता महाप्रसाद,दुपारी २.३० वाजता स्वरधारा संगीत संच सावंतवाडी यांचा संगीत मैफिल कार्यक्रम,सायंकाळी ४ वाजता स्थानिकांची भजने, सादर करण्यात आली.तसेच श्री देव दाळकर म्हाळाई मित्रमंडळ आणि सुरज डिचोलकर मित्रमंडळ पुरस्कृत रात्री ७.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

यावेळी श्री तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर देवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. पूर्ण मंदिर परिसर श्री देव शिवशंकराच्या जय घोषाने गजबजून गेला होता .यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी या उत्सवाला गर्दी केली होती.