रेल कामगार सेना याची रत्नागिरी या ठिकाणी महत्त्वाची बैठक संपन्न
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या वर यावेळी करण्यात आली चर्चा

सिंधुदूर्ग
रेल कामगार सेना याची रत्नागिरी या ठिकाणी महत्त्वाची बैठक पार रेल कामगार सेना अध्यक्ष माजी खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली व कोकण रेल्वे सरचिटणीस राजू सुरती तसेच अध्यक्ष श्री शशी नायर , खजिनदार श्री विश्वास राणे याच्यासोबत चिपलुण ,खेड ,रत्नागिरी , कणकवली कमिटी मेंबर याच्यासोबत रत्नागिरी आर.आर.एम श्री काबळी आणि इतर अधिकारी यांचा सोबत महत्त्वाची बैठक झाली.
यावेळी विवध मुद्द्यावर चर्चा झाली . MACPS चे ऑर्डर काढणे,स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देणे,खूप वेळ स्थगित असलेले मुद्दे यावर चर्चा झाली , पॉईंट्समन लोकांची ट्रान्सफर ऑर्डर काढणे ,चुकीच्या पद्धतीने दिलेल्या चार्जेशीट मागे घेण्यात घ्याव्या , अशा सर्व मुद्यावर आर.आर.एम श्री कांबळे यांनी तत्वतः मान्यता दिली तसेच विवध विषयावर सकारात्मक मान्यता दिली यावेळी चंदन गुरव.गणपत दळवी यावेळी उपस्थित होते.रेल कामगार सेना झिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या महत्त्वाच्या बैठकीवेळी कोकण रेल्वे कर्मचारी यांच्या विविध समस्या वर चर्चा करण्यात आली.


रेल कामगार