श्री देवी माऊलीच्या चरणी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर लीन,सर्वांना सुखी ठेव, घातले गाऱ्हाणे

सावंतवाडी

दक्षिण कोकणचे पंढरपूर सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सपत्नीक दर्शन घेतले. देवी माऊलीचा जत्रोत्सव उद्या होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. दिपक केसरकर यांनी आज भेट दिली. यावेळी सर्वांना सुखी ठेव, असे गाऱ्हाणे त्यांनी देवी चरणी घातले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सरपंच नारायण हिराप , देवस्थान ट्रस्टचे राजेंद्र गावकर, रमेश गावकर, बाळा गावकर, सुरेश गावकर, सुरेश सावंत आदी उपस्थित होते.