होडावडा ग्रामपंचायतच्या वतीने कृषी कन्यांचे स्वागत

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा गावात कृषीकन्यांचे आगमन

झाल्यानंतर होडवाडा गावच्या सरपंच सौ .रसिका केळुसकर,उपसरपंच मा. श्री राजबा सावंत,ग्रामसेवक रत्नप्रभा टेमकर, लिपीक,समीर सावंत तसेच इतर कर्मचारी वर्ग व उपस्थित ग्रामस्थ मंडळी यांनी कृषी कन्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाचे नियोजन सरपंच सौ.रसिका केळुसकर यांनी केले. या कार्यक्रमात कृषीकन्यांनी फळझाडांच्या रोपांचे वाटप केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस- ओरोस येथे या विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोस चे प्राचार्य योगेश पेडणेकर व कार्यक्रम अधिकारी प्रा. ओगले सर, प्रा. परुळेकर व प्रा. गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या सृष्टी पटेकर, प्रतीक्षा पंडित, हरिता दास, श्री लक्ष्मी के ,गौरी पी आर या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RWAE )या कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेती, पारंपारिक नैसर्गिक शेती ,शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, वृक्ष लागवड, बीज प्रक्रिया, कृषी विषयक कार्यशाळा घेणे,असे विविध उपक्रम राबवणार आहेत.