राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी भरला अपक्ष फॉर्म

ही लढाई स्वाभिमानाची, निष्ठेची.!

अर्चना घारेंनी फुंकले रणशिंग.

ही आता अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई.

सावंतवाडी :

मला सावंतवाडी मतदार संघातील जनतेचं प्रेम खूप मिळालं आणि मिळतं आहे. येथील जनता हृदयापासून माझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत सावंतवाडी मतदारसंघातील सर्व स्तरावरील जनतेने मला प्रेम दिलं. आज वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असला तरी येथील जनतेचं मला भरभरून प्रेम मिळालं आहे. आजपर्यंत सावंतवाडी मतदार संघाला न्याय मिळाला नाही. याचं कारण आपण शोधायला हवं. आज रोजगार आणि आरोग्य या मूलभूत समस्या कायम आहेत. ही आता विकासासाठीची लढाई आहे.

अस्मितेची लढाई आहे, म्हणून आता आपण निष्ठावंत म्हणून आपण आपली लढाई सुरू ठेवू, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या अर्चना घारे – परब यांनी केले. आज अर्चना घारे परब यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला सावंतवाडी विधानसभेचा आपला फॉर्म भरला यावेळी मोठया प्रमाणात अर्चना घारे परब यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.