ठळक घडामोडी

हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश

हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश
कणकवली:

कणकवली:
जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, भारतीय जनता पार्टीमध्ये इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत. याचाच प्रत्यय कणकवली तालुक्यात आला आहे. हरकूळ बुद्रुक, सुतारवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजप) भव्य पक्षप्रवेश केला.
या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, तसेच त्यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी संपन्न झाला.
या पक्षप्रवेशामुळे हरकूळ बुद्रुक परिसरातील उबाठा सेनेला मोठा धक्का बसला आहे.
🌟 भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे:
यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अतुल मेस्त्री, दीपक मेस्त्री, अजय मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, प्रवीण मेस्त्री, महेश मेस्त्री, लक्ष्मण मेस्त्री, जयदीप मेस्त्री, संदीप मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, बाळकृष्ण मेस्त्री, रवींद्र मेस्त्री, सुवास मेस्त्री, दीपक मेस्त्री, प्रशांत मेस्त्री, कमलेश मेस्त्री अशा अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर:
या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशावेळी माजी सभापती बाबासाहेब वर्देकर, भाजपचे पदाधिकारी राजू पेडणेकर, चंद्रकांत परब, तुकाराम खोचरे, परशुराम घाडीगावकर, उमेश सापळे, इमरान शेख, मामा माणगावकर, बाळू मोर्ये, निलेश तेली, सचिन तेली आदी मान्यवर उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे कणकवली तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.