रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!सावंतवाडीत पत्रकार परिषदमध्ये शैलेश परब यांनी दिले आवाहन


पराभवाची हॅट्ट्रिक होणार या भीतीने माजी खासदार निलेश राणेंचे खोटे आरोप
उबाठाच्या शैलेश परब यांचे राणेंच्या टिकेला प्रत्युत्तर
सावंतवाडी
माजी खासदार निलेश राणे यांनी रेडी पोर्ट आणि मायनिंग कडुन हप्ता वसुली करतो असे आमच्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत .
आम्ही हप्ता वसुली करत असल्याचे पुरावे माजी खासदार निलेश राणे यांनी जनतेसमोर कधीही उघड करावे असे आव्हान खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत, भाचे शैलेश परब यांनी निलेश राणे यांना दिले आहे. मंत्री नारायण राणे इन्कम टॅक्स मध्ये साधे क्लार्क होते. परंतु आता त्यांची संपत्ती दीडशे कोटी झाली आहे. ही संपत्ती त्यांनी कुठून आणली याचा हिशोब जनतेला द्यावा असे आव्हानही राऊत, परब यांनी माजी खासदार निलेश राणे यांना दिले. सिंधुदुर्गची प्रगती झाल नाही. मात्र ,राणे कुटुंबीयांची प्रगती झाली असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत , भाचे शैलेश परब, हिमांशू परब यांच्यावर रेडी पोर्ट आणि मायनिंग कडून हप्ता वसुली करत आहेत असा आरोप करीत काही छायाचित्र त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत सादर केली होती .तसेच यासंदर्भात ऑडिओ क्लिप जाहीर करणार असल्याचे सांगितले होते .या पार्श्वभूमीवर गीतेश राऊत, शैलेश परब यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली आणि निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिले