राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन) व नगरपालिका सफाई कामगार यांना जनसेवक पुरस्कार देऊन आले गौरविण्यात

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग व माजी नगरसेवक सुधीर आडिवडेकर यांच्या संयुक्त विद्यामाने पूजा साहित्य करण्यात आले वाटप

सावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा मार्फत 2023-24 जनसेवक पुरस्कारचे वितरण करण्यात आलं यावेळी, अहोरात्र सेवा देणारे विद्युत महामंडळ कर्मचारी (वायरमन) व नगरपालिका सफाई कामगार यांना जनसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लोकांसाठी अहो रात्र सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले .

तसेच या कार्यक्रमवेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग व माजी नगरसेवक सुधीर आडिवडेकर यांच्या संयुक्त विद्यामाने पूजा साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

विद्युत महामंडळाचे कर्मचारी विद्युत महामंडळ कर्मचारी कर्मचारी दत्तप्रसाद कांदे ,शुभम विजय कळसुलकर, राजेश रामचंद्र वेंगुर्लेकर,अमित रामचंद्र राऊळ,प्रितेश हळदणकर, सफाई कामगार तुकाराम हेमाजी जाधव, अमित किसन खोरागडे,बाबु गंगाराम बरागडे, सुनील गुरूलिंग पाटिल, यावेळी अध्यक्षांच्या कल्पनेतून वायरमन आणि सफाई कामगार यांचा यथोचित सत्कार करण्याचे ठरवले. यावेळी कार्यक्रमला जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर. सहसचिव कल्याण कदम ,सचिव रामचंद्र कुडाळकर ,जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे. जिल्हा सदस्य महिंद्रा चव्हाण. सावंतवाडी तालुकाध्यक्ष महिला अध्यक्षा संचिता गावडे. सुहासिनी शेट्ये. वनिता राणे. समीक्षा मोघे. रवींद्र मोघे. रूपाली राजन रेडकर. प्रणिता सावंत तसेच अन्य पदाधिकारी कार्यक्रमला उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव कल्याण कदम व आभार जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे यांनी मानले. यावेळी सत्कार करण्यात आलेल्या मान्यवर यांनी यावेळी आपले विचार मांडले.