सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर!सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, तर रामचंद्र कुडाळकर यांच्याकडे खजिनदारपदाची पुन्हा जबाबदारी


कार्यकारिणीही जाहीर : निवडप्रक्रिया बिनविरोध
सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर
सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, हर्षवर्धन धारणकर, मोहन जाधव आणि दिव्या वायंगणकर यांची निवड झाली. तर रामचंद्र कुडाळकर यांच्याकडेच खजिनदारपदाची जबाबदारी
सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या २०२५-२७ या वर्षांसाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच बिनविरोध पार पडली. तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सचिन रेडकर यांची सर्वानुमते निवड झाली तर उर्वरित कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यही बिनविरोध निवडले गेले.
सावंतवाडी जिमखाना येथील न.प. हॉलमध्ये झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया निवडणूक निरीक्षक परिषद प्रतिनिधी गणेश जेठे आणि जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सचिन खेडकर, सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, हर्षवर्धन धारणकर, मोहन जाधव आणि दिव्या वायंगणकर यांची निवड झाली. तर रामचंद्र कुडाळकर यांच्याकडेच खजिनदारपदाची जबाबदारी पूनश्च सोपविण्यात आली.
याव्यतिरिक्त, राजू तावडे, नागेश पाटील, रमेश बोंद्रे, संतोष परब, लुमा जाधव, मंगल कामत, अनुजा कुडतरकर, दीपक गांवकर, अजित दळवी, भुषण आरोसकर आणि निलेश परब यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मावळते अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेतला आणि नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष सचिन रेडकर यांनी अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, सर्वांना विश्वासात घेऊन आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाच्या हितासाठी काम करणार आहेत.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर आणि राजू तावडे यांनीही आपले विचार व्यक्त केले आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांनी आभार प्रदर्शन केले.
या महत्त्वपूर्ण निवड सभेत ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, राजेश मोंडकर, सागर चव्हाण, विजय देसाई, लुमा जाधव, उत्तम नाईक, आशुतोष भांगले, निलेश मोरजकर, प्रविण परब, विराज परब, विश्वनाथ नाईक, मंगल नाईक-जोशी, जतिन भिसे, समिर कदम, महादेव सावंत, स्वप्नील उपरकर, गुरूनाथ पेडणेकर, अनिल भिसे, अनिल चव्हाण, अभय पंडीत, काका भिसे, दीपक गांवकर, उमेश सावंत, अर्जून राऊळ, अवधुत पोईपकर, प्रा. रूपेश पाटील, रूपेश हिराप, निखिल माळकर, साबाजी परब, भुवन नाईक यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.



