गणित संबोध परीक्षेत निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे यश


सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी ठाणे संचलित संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या 22 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या सार्थक परब, हर्ष केणी, प्रणव गावडे,भवदिप परब,श्रेयस परब,आयुष गुडेकर स्वरा सोनुरलेकर,विराज परब,सेनल फर्नांडिस, विराज घाडि, अद्वैत गावडे यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच इयत्ता आठवीतील सिध्दराज आचरेकर, नचिकेत भाईडकर,सोनू नाईक, निखिल मयेकर, शौनक हरमलकर , आदित्य धावडे यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. 17 विद्यार्थी घवघवीत यश प्राप्त करून प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना गणित संबोध परीक्षेसाठी प्रशालेचे गणित विषयाचे शिक्षक श्री. रुपेश सावंत व शिक्षिका श्रीम. स्नेहल गवस यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे चेअरमन डॉ. शेखर जैन व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे यांनी अभिनंदन केले.