ठळक घडामोडी

तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी!

तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी!

तळवडे प्रतिनिधि


तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, १६ नोव्हेंबर२०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

या मंगलमय सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
सकाळपासूनच जत्रोत्सवाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. यात प्रामुख्याने गाऱ्हाणे घालणे, ओटी भरणे, नवस बोलणे आणि नवस फेडणे आदी महत्त्वाचे विधी भाविकांना करता येतील.रात्री पालखी प्रदक्षिणा आणि दशावतार नाट्यप्रयोगरात्रीच्या वेळी मंदिराचा परिसर अधिक तेजोमय होणार आहे: रात्री १०.३० वाजता: पालखी प्रदक्षिणा, दिपोत्सव आणि लोटांगणे कार्यक्रम होतील.त्यानंतर उशिरा: प्रसिद्ध पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा शानदार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
श्री देवी सातेरीच्या या पवित्र जत्रोत्सवाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील आणि दूरदूरच्या भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकर मंडळी आणि ग्रामस्थांनी केले आहे.