ठळक घडामोडी

महाराष्ट्र राजकारणात भूकंप! अखेर ‘ठाकरे बंधू’ एकत्र; मुंबई महापालिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना-मनसे’ युती जाहीर

एकोणीस वर्षांनी ठाकरे बंधू झाले एकत्र

महाराष्ट्र राजकारणात भूकंप! अखेर ‘ठाकरे बंधू’ एकत्र; मुंबई महापालिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना-मनसे’ युती जाहीर

मुंबई:
गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता, ती ऐतिहासिक घटना अखेर घडली आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन भावांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी युतीची अधिकृत घोषणा केली आहे.

वरळी येथील ‘ब्ल्यू सी’ हॉटेलमध्ये पार पडलेल्या धडाकेबाज पत्रकार परिषदेत या नव्या राजकीय समीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

‘शिवतीर्था’वर दर्शन अन् एकत्र पाऊल

पत्रकार परिषदेपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दादर येथील शिवतीर्थावर जाऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसल्याने शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
“आता चुकाल तर संपाल…” : उद्धव ठाकरे यांचा इशारा
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक दिसले. ते म्हणाले, “यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचा खात्मा केल्याशिवाय आम्ही ठाकरे बंधू स्वस्थ बसणार नाही. आता चुकाल तर संपाल, फुटाल तर तुटून जाल! महाराष्ट्राचा वसा टाकू नका.” एकीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी मराठी माणसाला एकत्र येण्याचे आवाहन केले.
राज ठाकरेंची राजकीय टोळ्यांवर फटकेबाजी
राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. युतीची घोषणा करताना ते म्हणाले, “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. राज्यात सध्या मुले पळवणाऱ्या टोळ्यांसोबतच दोन राजकीय टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. त्यांना रोखण्यासाठी शिवसेना आणि मनसेची युती आज मी जाहीर करत आहे.” जागावाटपाचा आकडा आताच स्पष्ट न करता, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.