तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये पोहचले.

. तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी रक्तपेढीमध्ये पोहोचले.

ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदाते यांनी केले मोलाचे योगदान

     सावंतवाडी -गुरुवार दि. ०५ जून २०२५ रोजी गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथे अंबाजी रेडकर रा. कारीवडे यांच्या बायपास सर्जरी (हृदय शस्त्रक्रिया) चे वेळी एकूण आठ रक्तदात्यांची आवश्यकता होती. त्यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या समूहावर पोस्ट येताच संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते विनायक वर्णेकर (ओटवणे) यांच्यासहीत मळगावचे गणेश राऊळ, कुडाळचे नितेश खोत तसेच कारीवडेमधील अक्षय राणे, निशांत रेडकर व आकाश रेडकर इत्यादी सहा रक्तदात्यांनी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.* 
    चराठेमधील राजू ठाकूर, कारीवड्यातून प्रवीण सावंत व विकी राणे तसेच अनंत गावकर हे कुडाळमधून रक्तदान करण्यासाठी गेले होते. परंतु रक्ताची गरज पूर्ण झाल्यामुळे या सर्वांना राखीव ठेवण्यात आले होते.
 कुडाळवरून अनंत गावकर व नितेश खोत हे रक्तदाते मोटरसायकलने गेले होते तर कारीवडे, चराठे आणि ओटवण्यातील रक्तदात्यांना प्रेम रेडकर हे आपल्या गाडीने घेऊन गेले होते.
   या सर्व रक्तदात्यांना एकत्र करुन नेण्यासाठी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते तेजस रेडकर यांनी भरपूर मेहनत घेतली.