१ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग”यांचे आगमन !माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा

माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा : शेकडो शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी


सावंतवाडी

१ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग” रुद्रपुजा माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली‌. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा संपन्न झाली.

वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते ज्योतिर्लिंगाची विधीवत पूजा संपन्न झाली‌. यानंतर शेकडो शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.

शिव भक्तीत भक्तगण तल्लीन झाले होते. सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अशोक दळवी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल नाडकर्णी,भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग, दीपा सावंत, आनंद पोयेकर, बाळकृष्ण सावंत, अँड निता कविटकर, किरण नाटेकर, अर्चना पांगम, दिपाली सावंत, शुभांगी सुकी, भारती मोरे, नितिन मांजरेकर, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, आबा केसरकर, तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले, मी एक शिवभक्त आहे‌. सावंतवाडी संस्थानचे कुलदैवत शंकर आहे. त्यामुळे लहानपणापासून आम्ही शिवशंकराची आराधना करतो. १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं असं सोरटी सोमनाथ आहे‌. त्याकाळात अनेक हल्ले या मंदिरावर झालेत. शिवलिंग भंग करण्यात आलं. काही निष्ठावंत पुजाऱ्यांनी त्याचे अवशेष जपले. एक हजार वर्ष हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित होते. शंकराचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे श्री श्री रविशंकर स्वामींजींच्या माध्यमातून ही परंपरा जपली जात आहे. चुंबकीय शक्ती असणार हे शिवलिंग अधांतरी राहत होते. ही अलौकीक अशी भारताची परंपरा होती. ती जपण्याचं काम ही मंडळी करत आध्यात्माच नेतृत्व करत आहे. आमच्या वास्तूत शिवलिंग आलं हे माझं भाग्य समजतो. ही भूमीच शंकराची आहे‌. या भूमीत ज्योतिर्लिंगाच आगमन होण भाग्याचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथ मंदिराची प्रतिष्ठापना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी अध्यक्ष आहेत‌. ते भव्य स्वरूप या अलौकिक ठेव्याला प्राप्त करून देतील. श्री श्री रविशंकर स्वामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावे अशी आमची इच्छा आहे. त्यांचे भव्य स्वागत जिल्ह्यात केलं जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक दर्शक हाथी म्हणाले, कोकण भूमी ही तपोभूमी आहे‌. कणकवली, सावंतवाडीत रूद्रपूजा झाली‌. भक्ती अन् श्रद्धा इथे नांदत आहे‌. एक हजार वर्षांपूर्वी आक्रमण झालं अस नाही, आजही ती होत आहेत. आम्ही कमजोर होतो तेव्हा ती आक्रमण होतात. त्यामुळे आपली संस्कृती, परंपरा मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. याच दृष्टीने संपूर्ण कोकण दौरा आम्ही करत आहोत. रत्नागिरी, रायगड, मुंबईनंतर संपूर्ण देशभरात ही यात्रा होईल. त्यानंतर ज्योतिर्लिंगाची विधीवत पुनर्स्थापना केली जाईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
जाहिरात –

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळा निवडताय??
👇👇मग एकमेव पर्याय👇👇

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे

📣 प्रवेश सुरू!! प्रवेश करू!! प्रवेश सुरू!! 📣

प्री प्रायमरी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू…..

️⃣ हीच शाळा का?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम व एकमेव AI based अभ्यासक्रमावर आधारित असणारी शाळा.

🔵 काय व कसा असणार AI based अभ्यासक्रम??? 🔵

JEE व NEET सारख्या स्पर्धा परीक्षांची पायाभरणी AI based अभ्यासक्रमाच्या आधारे इयत्ता पाचवीपासूनच.

इयत्ता सहावी व सातवी या स्मार्ट वर्गखोल्या (Smart Classrooms):

इंटरॲक्टिव्ह डिस्प्ले, AI पॉवर्ड शिक्षण उपकरणे आणि हाय-स्पीड इंटरनेट असलेल्या दोन वर्गखोल्या असतील.

वैयक्तिकृत शिक्षण (Personalized Learning):

प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार आणि क्षमतेनुसार AI आधारित प्लॅटफॉर्म शिकवण्याचे साहित्य आणि पद्धती तयार करेल. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देता येईल आणि विद्यार्थ्यांना नवीन आव्हाने दिली जातील.

वास्तववादी आणि प्रात्यक्षिक शिक्षण (Practical & Experiential Learning):

केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी AI टूल्स, रोबोटिक्स, डेटा ॲनालिसिस यांसारख्या गोष्टींचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल. यातून त्यांचे कौशल्य वाढेल.

समस्या निराकरण (Problem-Solving):

AI च्या मदतीने विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्यांवर आधारित प्रकल्प (Project-based learning) दिले जातील, ज्यामुळे त्यांची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढेल.

सातत्यपूर्ण मूल्यांकन (Continuous Assessment):

AI आधारित सिस्टीम विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने मूल्यांकन करेल आणि त्यांना तसेच पालकांना त्यांची कामगिरी (Performance) कशी आहे, याची माहिती देईल.

AI आधारित प्लॅटफॉर्म (AI-powered Platform):

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक विशेष ऑनलाइन प्लॅटफॉर्म असेल जिथे त्यांना अभ्यासक्रम, गृहपाठ, आणि त्यांच्या प्रगतीचा अहवाल (Progress report) पाहता येईल.

AI व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिॲलिटी (VR/AR):

गुंतागुंतीच्या संकल्पना (Complex concepts) अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिॲलिटीचा वापर केला जाईल.

कौशल्य विकास (Skill Development):

शिक्षक विद्यार्थ्यांना AI च्या मदतीने शिकवून भविष्यासाठी तयार करतील.

भविष्यातील कौशल्यांवर लक्ष (Focus on Future Skills):

AI आणि डेटा सायन्स, कोडिंग, रोबोटिक्स, क्रिटिकल थिंकिंग यांसारख्या भविष्यात आवश्यक असलेल्या कौशल्यांवर विशेष भर दिला जाईल.

️⃣ शाळेच्या इतर महत्त्वपूर्ण बाबी #️⃣

उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा

अनुभवी आणि उच्चशिक्षित शिक्षकवृंद.

नवीनतम अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या आधुनिक पद्धती.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष.

स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर.

अभ्यासक्रमासोबतच कला, संगीत, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर विशेष लक्ष.

व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व गुणांची जोपासना.

मूलभूत नैतिक मूल्यांची शिकवण.

विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव.

सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा.

विस्तीर्ण खेळाचे मैदान.

सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण.

ग्रंथालय आणि वाचनालय.

संपूर्ण शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही पाळत ठेवणारी सुरक्षा व्यवस्था.

पालकांशी नियमित संवाद आणि पाल्याच्या प्रगती अहवालाची माहिती.

परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण.

वाहतूक सुविधा उपलब्ध.

प्रवेशासाठी मर्यादित जागा,

आजच संपर्क साधा!!!📞📞📞
📲 7498478189
☎️02363-278835
💻 Mail. Id – sanskarns23@gmail.com

पत्ता:-📋
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे
मु.पो. निरवडे (आरोस तिठा),
ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग.

“ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी…”
“तुमच्या पाल्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी!”
संस्कार नॅशनल स्कूल!!!!!
………………………………………….
महासिंधू न्यूज चॅनल वेबसाईट

https://mahasindhunews.in
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓
कृपया, आमच्या You Tube चॅनेलला एकदा तरी नक्की भेट द्या.! व सबस्क्राईब करा🙏🙏

महासिंधू न्यूज चॅनल वेबसाईट

https://mahasindhunews.in✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

कृपया, आमच्या You Tube चॅनेलला एकदा तरी नक्की भेट द्या.! व सबस्क्राईब करा🙏🙏
👇👇👇👇👇

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇