

लेक ही ईश्वराची सर्वात सुंदर देणगी; मान्यवरांनी व्यक्त केले कृतज्ञतेचे भाव.”निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ साजरा

“लेक ही ईश्वराची सर्वात सुंदर देणगी; मान्यवरांनी व्यक्त केले कृतज्ञतेचे भाव.”
निरवडे
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करून मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रणाली रेडकर आणि मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन यांनी आपल्या संदेशातून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
बालिका दिनानिमित्त अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून तसेच त्यांच्या काव्यपंक्तींचे गायन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
“स्त्री शिक्षण आणि सावित्रीबाई फुले” या विषयावर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली.
तसेच शाळेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती रुची देसाई मॅडम,श्रीमती धनश्री तुळसकर मॅडम, श्रीमती राधिका पणशीकर मॅडम तसेच प्रशालेचे सी.इ.ओ.श्री .मनिष सावंत सर यांनी सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षण प्रसारासाठी भोगलेले कष्ट आणि आजच्या काळातील महिलांच्या प्रगतीवर मार्गदर्शन केले तसेच आजच्या युगात महिलांसमोर असलेली आव्हाने आणि मुलींची बदलती मानसिकता याकडे लक्ष वेधले.
मुलींचे सक्षमीकरण हेच ध्येय
मुख्याध्यापिका सौ.प्रणाली रेडकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या काळात मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल केले आहे. संस्कार नॅशनल स्कूलच्या माध्यमातून आम्ही मुलींना केवळ शालेय शिक्षणच नाही, तर एआय (AI) सारखे आधुनिक तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातही सक्षम बनवत आहोत.”
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींच्या उत्साही सहभागामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ममता वैद्य मॅडम यांनी केले.






