ठळक घडामोडी

मळेवाड येथे जोरदार वारा पावसाच्या तडाख्यात रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वाराच्या गाडीवर चिंचेची भली मोठी फांदी पडून दुचाकी स्वार जखमी

मळेवाड येथे जोरदार वारा पावसाच्या तडाख्यात रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वाराच्या गाडीवर चिंचेची भली मोठी फांदी पडून दुचाकी स्वार जखमी

केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळवी

अधिक उपचारासाठी दुचाकी स्वाराला हलविले गोव्याला :- मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान

स्थानिकांनी दुचाकी स्वाराला तत्काळ बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला

जोरदार वारा पावसाच्या तडाख्यात चिंचेचे झाड कोसळले

मळेवाड प्रतिनिधि

मळेवाड येथून आरोंदा च्या दिशेने जात असताना मळेवाड (केरकरवाडी) येथे भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाची फांदी या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारावर पडली.केवळ दैव बलवत्तर म्हणून यातून हे दुचाकी स्वार वाचले. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या दुचाकी स्वाराला बाहेर काढले.दुचाकी स्वार मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी गोव्याला हलविण्यात आले.
मात्र या अपघातात त्यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


संबंधित दुचाकी स्वार हे पालये गोवा येथील असल्याचे कळते.
यावेळी स्थानिकांच्या चार चाकी वाहनांचे, महावितरण च्या विद्युत वाहिन्या , पोलाचे बरंच नुकसान झाले आहे.
येथील ग्रामस्थ झिला केरकर,शशिकांत चराटकर, मयूर केरकर,सुनील केरकर, पप्या केरकर,संदीप कुंभार,शरद केरकर,बाळा धर्णे , कारवालो तसेच येथील ग्रामस्थांनी तत्काळ हे पडलेले चिंचेचे झाडं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.मात्र ह्या रस्त्यां च्या बाजूला असणाऱ्या जुनाट झाडांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्यां येणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे