ठळक घडामोडी

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या प्रचाराचा ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ घेऊन शुभारंभ!

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या प्रचाराचा ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ घेऊन शुभारंभ!

वेंगुर्ले, ता. २०: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने शहरातील दहाही प्रभागांमध्ये प्रचाराचा विधिवत शुभारंभ केला असून, पहिल्या टप्प्यातच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रचाराला सुरुवात करताना पक्षाने देव-देवतांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराच्या कार्याला सुरुवात केली आहे.
🚩 प्रभाग क्र. १ मध्ये भव्य शुभारंभ
प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, त्यात प्रामुख्याने यांचा समावेश होता:माजी केंद्र प्रमुख आर. के. जाधव, बुथ प्रमुख विलास कुबल,उमेदवार युवराज जाधव,यशस्वी नाईक, योगेश नाईक, रूपेश घोलतकर, प्रसाद खानोलकर, दीपाली प्रीतम वाडेकर,शर्मिला शेणई,सुप्रिया कोंडसकर, जयवंत म्हापणकर
,पलाश वाडेकर, वैभव जाधव,विशाखा जाधव, मयुरेश जाधव, अर्जुन मठकर, यशश्री जाधव, जागृती जाधव,पल्लवी मठकर
,गीता जाधव, मंदालिनी जाधव, अनुसया जाधव,सुरेश जाधव, सुनीता जाधव,साईश जाधव,यश जाधव, रोशन जाधव, अक्षया जाधव, वासंती जाधव,भाजपने देव-देवतांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केल्याने कार्यकर्ते उत्साहात असून, निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.