आध्यात्मिक जागृति – आधि-व्याधीचा उपचार संत निरंकारी मिशन मार्फत 21 जूनला देशभर योग दिवसाचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 03 ठिकाणी आयोजन
सिंधुदूर्ग
संत निरंकारी मिशन मार्फत ‘आंतर्राष्ट्रीय योग दिवस’ निमित्ताने शुक्रवार, दि. 21 जून रोजी संपूर्ण भारतवर्षातील संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी 6.00 वाजल्यापासून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या निर्देशनाखाली खुल्या प्रांगणांत तसेच उद्यानांमध्ये योग दिवसाचे उत्साहपूर्वक आयोजन करण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाकडून या वर्षी आंतर्राष्ट्रीय योग दिवसाचा विषय ‘महिला सशक्तिकरणासाठी योग’ असा देण्यात आला आहे जी आज काळाची गरज आहे यात तिळमात्र शंका नाही. संत निरंकारी मिशनदेखील वेळोवेळी महिला सशक्तिकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रयासरत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिलाई व एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण केंद्र, ब्यूटीशियन कोर्स, टयूशन सेंटर इत्यादींचा समावेश आहे.
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत ‘योग दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संत निरंकारी सत्संग भवन नियोजित जागा ओरोस, ता. कुडाळ, श्री.शिवराम सावळ यांच्या निवासस्थानी, मिरिस्तेवाडी, मातोंड, ता.वेंगुर्ला, सावंतवाडी ख्रिश्चनवाडी, फॉरेस्ट कॉलनी जवळ, माजगाव येथील श्री. जयवंत सातपुते यांच्या निवासस्थान आदी ठिकाणांवर‘आंतर्राष्ट्रीय योग दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहाने केले जाणार आहे.
‘योग’ ही एक अशी प्राचीन पद्धत आहे ज्याद्वारे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्य संतुलित केले जाते. योगाच्या नियमित अभ्यासाने तनाव मुक्त जीवन जगता येते.
महिलांच्या सशक्तिकरणात योगाला विशेष महत्व आहे. वर्तमान काळात जिथे महिला गृहस्थ जीवनाबरोबरच विविध कार्यक्षेत्रांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत अशा परिस्थितीत त्यांच्या व्यस्त जीवनामध्ये योग ही एक आवश्यक बाब झाली आहे ज्यायोगे त्यांना आपल्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी ऊर्जा व सहायता प्राप्त होते.