

उमाकांत वारंग यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
उमाकांत वारंग यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी येथील प्रतिष्ठित सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी आज, मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये ज्येष्ठ संचालक उमाकांत सदाशिव वारंग यांची उपाध्यक्षपदी एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया आणि निकाल
संस्थेच्या कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) श्री. सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपाध्यक्ष पदासाठी केवळ उमाकांत वारंग यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. मुदतीत कोणताही अन्य अर्ज न आल्याने आणि वारंग यांनी अर्ज मागे न घेतल्याने, श्री. कदम यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले.
वारंग यांचे योगदान
नवनिर्वाचित उपाध्यक्ष उमाकांत वारंग हे सामाजिक, सहकार, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. पतपेढीच्या उभारणीत आणि संस्थेची आर्थिक प्रगती साध्य करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा संस्थेला फायदा होईल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला.
उपस्थित मान्यवर या निवड प्रक्रियेवेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक., रमेश बोंद्रे, वाय पी नाईक,दत्ताराम सावंत, श्रीमती सीमा मठकर, श्रीमती वैष्णवी बांदेकर, श्रीमती किशोरी कुडतरकर, श्रीमती मनीषा मिशाळ, देवेंद्र तुळसकर, चंद्रकांत शिरोडकर, शरद सावंत, सदानंद जाधव आदी उपस्थित होते.
माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. संस्थेचा कारभार नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने चालवून पतपेढीचा आर्थिक उत्कर्ष वाढवण्यावर माझा भर असेल. कायद्याच्या चौकटीत राहून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.”
उमाकांत वारंग (नवनिर्वाचित उपाध्यक्ष)
सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
उमाकांत वारंग यांच्या निवडीबद्दल सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब, पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे यांच्यासह सहकार, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





